विना मास्क असलेल्या घोळक्यात बाळासह मातांना बसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:39+5:302021-06-06T04:21:39+5:30
पर्यवेक्षिकेचा संतापजनक प्रताप : कार्यवाहीची मागणी गोंडपिपरी : टीएचआर पोषण आहार अपहार चौकशी प्रकरणात संतापजनक प्रकार पुढे आला ...
पर्यवेक्षिकेचा संतापजनक प्रताप : कार्यवाहीची मागणी
गोंडपिपरी : टीएचआर पोषण आहार अपहार चौकशी प्रकरणात संतापजनक प्रकार पुढे आला आहे. पर्यवेक्षिकेने चक्क दीड वर्षाच्या बाळासह मातेला बोलाविले. यासोबत चार आणि नऊ वर्षाच्या बाळांसह दोन मातांनाही बोलाविण्यात आले. विना मास्क असलेल्या महिलांच्या घोळक्यात या मातांना बसविले. संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका बालकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशात महिला बाल कल्याण विभागाकडून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
धाबा येथील अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये कथित टीएचआर पोषण आहार अपहार प्रकरणाची चौकशी करण्यात आली. ही चौकशी अंगणवाडी इमारतीत न होता धाबा ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली. सभागृहात सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांची उपस्थिती होती. सोबतच धाबा विभागातील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. चौकशीसाठी पर्यवेक्षिका ठेमस्कर यांनी ग्रामपंचायत परिसरातील महिलांनाही बोलाविले. यात दीड वर्षाच्या बाळाची माताही होती. सोबत चार आणि नऊ वर्षाचा बाळांची माताही होत्या. सभागृहात आलेल्या महिलांना मास्क दिल्या गेले नाही. अनेक महिला विना मास्क होत्या. विना मास्क असलेल्या महिलांच्या घोळक्यात त्या मातेला बसविण्यात आले. धाबा गाव कोराना हॉटस्पाॅट ठरले होते. अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काहींना जीव गमवावा लागला. संभाव्य तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बॉक्स
मुले रडत होती
साधारणत: ही चौकशी दोन तास चालली. अपशब्दात अंगणवाडी सेविका, मदतहपस यांना बोलले जात होते. या प्रकाराचा व्हिडिओ पुढे आला आहे. यामध्ये बालकांझचक रडण्याचा आवाज येत आहे. बालके रडत असतानाही पर्यवेक्षिकेने त्या मातांना बाहेर जाऊ दिले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोट
ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या चौकशीदरम्यान विना मास्क उपस्थित असलेल्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
-शेषराव भुलकुंडे, संवर्ग विकास अधिकारी, गोंडपिपरी.