परिस्थिती विस्फोटक, तरीही लोक ऐकत नाही म्हणून कडक लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:40+5:302021-04-21T04:28:40+5:30
यावेळी त्यांनी काही खासगी रुग्णालयांवर चांगलेच ताशेरे ओढले. खासगी रुग्णालय कोणत्याही गंभीर रुग्णांना बेड नाही म्हणून त्यांना भरती करून ...
यावेळी त्यांनी काही खासगी रुग्णालयांवर चांगलेच ताशेरे ओढले. खासगी रुग्णालय कोणत्याही गंभीर रुग्णांना बेड नाही म्हणून त्यांना भरती करून घेत नाही. राजकीय लोकांचे फोन गेले तर बेड देतात, मात्र तेही गंभीर रुग्णांना देत नाही. ज्याचे ऑक्सिजन लेवल ९० च्या वर आहे. असेच रुग्ण घ्यायचे आणि त्यांना चुना लावायचा हा एकमेव धंदा सुरू झालेला आहे, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी काही खासगी रुग्णालयावर ताशेरे ओढले. रात्री एक राऊंड झाला की फिजिशियन येत नाही. रात्रीला हाॅस्पिटल नर्स आणि टेक्निशियनच्या भरवशावर सुरू आहे. ते रात्रीला बाहेरून अचानक आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले.
यंत्रणेला मर्यादा आहे. यापलीकडे काहीही करता येत नाही. लोकप्रतिनिधींना दररोज शंभर फोन येतात. प्रत्येकांची एकच मागणी असते. हाॅस्पिटल फुल्ल आहे. व्हेंटिलेटर फुल्ल आहे. ही सगळी परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे. लोकांना वारंवार सांगितले जात आहे. तरीही बाहेर पडत आहे. कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. लोकांनी आता काळजी घेतली नाही तर परिस्थिती याही पेक्षा विस्फोटक होऊ शकते, अशी भीतीही यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
खासगी प्रयोगशाळेतही होणार आरटीपीसीआर
रुग्णसंख्या वाढत आहे. आरटीपीसीआर चाचण्यांनाही मर्यादा आलेल्या आहेत. दिवसाला १४०० टेस्टिंग करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ज्या खासगी प्रयोगशाळा आहे. त्यांनाही सुद्धा अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीच्या परवानगीबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.