एपीएलएल कंपनी प्रकरणातील सहा आरोपी मोकाट

By admin | Published: August 23, 2014 01:40 AM2014-08-23T01:40:30+5:302014-08-23T01:40:30+5:30

आयटीची पदविका देण्याचे आश्वासन दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांचे एजंट अद्यापही मोकाट आहे.

Six accused in APLL company case Mokat | एपीएलएल कंपनी प्रकरणातील सहा आरोपी मोकाट

एपीएलएल कंपनी प्रकरणातील सहा आरोपी मोकाट

Next

लखमापूर : आयटीची पदविका देण्याचे आश्वासन दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांचे एजंट अद्यापही मोकाट आहे. यातील अन्य आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आयटीची पदविका देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. क्लॉसम कॅम्प्यूटर इंस्टिट्यूटचे संचालक गौस सिद्दीकी याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अतुल कोहपरे, संजय निमगडे, सचिन मडावी, हेमंत कुळसंगे, अर्जून अलाम, समय्या पनेट्टीवार यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे. कंपनीच्या नावाने ८७९९ रुपयांचा डी.डी. काढून विद्यार्थ्यांना आयटीचा डिप्लोमा देण्यात येणार होता. त्यामुळे कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदाफाटा, लखमापूर, पिंपळगाव, हरदोना, मानोली, सोनुर्ली, नारंडालोणी, कळमना, चिंचोली, तळोधी, खिर्डी, कवठाळा तसेच राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डी.डी.ची रक्कम भरुन प्रवेश घेतला. मात्र त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देता त्याची फसवणूक केली. विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांचे डी.डी. असल्याची माहिती पुढे आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Six accused in APLL company case Mokat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.