चिमूर पालिकेला कुलूप ठोकणाऱ्या सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:35+5:302021-05-12T04:29:35+5:30

सारंग दाभेकर (५२), विलास मोहीनकर (३०, दोघेही रा. चिमूर), कैलास भोयर (४२, रा. सोनेगाव (काग), शैलेश भोयर (२२, रा. ...

Six arrested for locking up Chimur Municipality | चिमूर पालिकेला कुलूप ठोकणाऱ्या सहा जणांना अटक

चिमूर पालिकेला कुलूप ठोकणाऱ्या सहा जणांना अटक

Next

सारंग दाभेकर (५२), विलास मोहीनकर (३०, दोघेही रा. चिमूर), कैलास भोयर (४२, रा. सोनेगाव (काग), शैलेश भोयर (२२, रा. सोनेगाव (काग), सिद्धांत कोब्रा (२७, रा. नागभिड), आदर्श कोब्रा (२५, रा. नागभिड) यांच्याविरुद्ध ३५३, ३३२, ३४२, १४३, १४७, १४९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ साथ रोग कलम ३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये गुन्हा नोंद केला करून अटक केली आहे.

सोमवारी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कामकाजात व्यस्त असताना गैरकायद्याची मंडळी नगर परिषदेच्या लोखंडी गेटजवळ आली. जोरजोराने ओरडत असताना तेथील दोन कर्मचाऱ्यांना हिलिंग टच हॉस्पिटलवर का कारवाई केली नाही, असे विचारत होते. कामात व्यस्त असलेले अधिकारी व कर्मचारी तेथे आले. त्यांनी पोलिसांना फोन करून या प्रकाराची दिली. पोलिसांना पाहून ही मंडळी पुन्हा जोरजोराने ओरडू लागली. त्यांना समजावून सांगण्याचा नगरपरिषद अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र ती मंडळी ऐकण्याच्या मन:स्थिती नव्हती. उलट प्रवेशव्दाराला कुलूप लावण्या प्रयत्न करीत होते. अधिकाऱ्यांनी कुलूप लावण्यास त्यांना मनाई केली असता कार्यालयातील गेटवर असलेले सुमित मेश्राम व राजेश सहारे यांना धक्काबुक्की केली. तसेच कार्यालय तोडफोड करण्याची धमकी दिली. तासभर शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यांना आतमध्ये डांबून या मंडळींनी नगरपरिषदेला कुलूप ठोकले. अखेर पोलिसांनी यातील सहा मंडळींविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत अटक केली.

Web Title: Six arrested for locking up Chimur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.