ताडोबातील सहा हत्ती निघाले गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 09:30 PM2022-05-19T21:30:15+5:302022-05-19T21:31:18+5:30

Chandrapur News ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती यापुढे ताडोबात दिसणार नाही. हे हत्ती गुरुवारी सकाळी गुजरातकडे रवाना झाले आहेत.

Six elephants from Tadoba left for Gujarat | ताडोबातील सहा हत्ती निघाले गुजरातला

ताडोबातील सहा हत्ती निघाले गुजरातला

Next
ठळक मुद्देताडोबात नवीन सदस्य येणार आणि ते प्रशिक्षित असणार

चंद्रपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती यापुढे ताडोबात दिसणार नाही. हे हत्ती गुरुवारी सकाळी गुजरातकडे रवाना झाले आहेत. या हत्तींना निरोप देताना वनविभागही काहीसा हिरमुसला होता. मात्र त्यांचाही नाईलाज होता. केंद्र सरकारच्या मंजुरीने ताडोबातील सहा हत्तींचा प्रवास गुजरातच्या दिशेने सुरू झाला आहे. यामध्ये चार नर आणि दोन मादी हत्तींचा समावेश आहे.

गुजरातमधील राजनगरातील राधे कृष्णा टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे हे हत्ती सोपविण्यासाठी केंद्र सरकारने महिनाभरापूर्वी मंजुरी दिली होती. याबाबतच्या पत्रातील मजकूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने उघड केला होता.

ताडोबात सहा हत्तींचे वास्तव्य होते. परंतु मागील काही काळात गजराज नावा हत्तीने तिघांना बळी घेतला होता. यामुळे हत्तींसह पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हापासून मोहुर्लीच्या ताडोबाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व हत्तींना ताडोबातील कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील कॅम्पमध्ये हलविण्यात आले होते. ताडोबात हत्तींना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित माहुत नव्हता. आवश्यक मनुष्यबळ नव्हते. यामुळे हे हत्ती येथे असुरक्षित झाले होते. सर्व बाबींचा विचार करता हे हत्ती गुजरातला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनेही याबाबीला मंजुरी दिल्याने ताडोबातील सर्व हत्तींना गुजरातकडे हलविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज त्यांना ट्रकने गुजरातला रवाना करण्यात आले, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी लोकमतला दिली.

ताडोबात कर्नाटकमधून दुसरे हत्ती येणार

ताडोबात हत्तींची नितांत गरज आहे. येथे येणारे हत्ती आता प्रशिक्षित असणार आहेत. येथे हत्तींच्या देखभालीसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ व माहुत देखील असणार आहे. हे नवीन हत्ती कर्नाटकमधून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ताडोबा जागतिक स्तरावरचा व्याघ्र प्रकल्प आहे. येथील हत्तींची कमी लवकरच भरून काढली जाईल, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

Web Title: Six elephants from Tadoba left for Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.