दोन कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:26+5:30
यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण दोन हजार ६०० बाटल असा दोन लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कारवाई करीत टाटा कंपनीची इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन व ह्युन्डाई कंपनीची आय-२० चारचाकी वाहन, हिरो कंपनीची स्प्लेन्डर दुचाकी वाहनासह सहा लाख ३९ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण दोन हजार ६०० बाटल असा दोन लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रविवारी आय -२० चारचाकी वाहनामधील मागच्या डीक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण एक हजार ५०० बाटल्स व दुचाकी वाहनावर देशी दारूच्या कंपनीच्या ९० मि.ली.च्या एकूण १०० बाटल्स असा एकूण सहा लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारोती पाटील, सहा. दु. नि. अजय खताळ, जगदीश कापटे, प्रविकांत निमगडे यांच्यासह राज्य शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.