कोरोना प्रतिबंधासाठी सहा लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:40+5:30
राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट (श्री बालाजी मंदिर चंद्रपूर व बल्लारपूर) तर्फे एक लाख असा एकूण सहा लाखांचा निधी राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटांवर मात करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहा लाखांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश सदर निधी युवा नेते राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडून शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला.
माजी खासदार नरेश पुगलिया यांनी स्वत: दोन लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. राज्यातील नागरिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट (श्री बालाजी मंदिर चंद्रपूर व बल्लारपूर) तर्फे एक लाख असा एकूण सहा लाखांचा निधी राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले, बल्लारपूर पेपर मील मजदूर ट्रस्टचे उपाध्यक्ष तारासिंग कलसी, महासचिव वसंत मांढरे, कोषाध्यक्ष रामदास वाग्दरकर, व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल ट्रस्टचे कोषाध्यक्ष क्रिष्णन नायर, माजी बल्लारपूर न.प. उपाध्यक्ष नासिर खान उपस्थित होते.