धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:15 AM2021-07-13T10:15:31+5:302021-07-13T10:18:37+5:30

Chandrapur : रात्रीच्या सुमारास दुर्गापूर गावातील 11 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा बंदच होता. यामुळे लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले होते.

Six members of the same family died in Chandrapur district | धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय

धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय

Next

चंद्रपूर - दुर्गापूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सहाही जणांचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विष बाधा झाली असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.

ही घटना सकाळच्या सुमारासच उघडकीस आली. मृतांमध्ये, रमेश मारोती लष्कर (38), लखन रमेश लष्कर (19), दातू रमेश लष्कर (30), माधुरी अजय लष्कर आणि पूजा रमेश लष्कर यांचा समावेश आहे. तर कृष्णा रमेश लष्कर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रीच्या सुमारास दुर्गापूर गावातील 11 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा बंदच होता. यामुळे लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले होते. त्यातूनच विषारी वायू गळती झाल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या 28 जूनला अजयचे लग्न झाले होते. त्याची पत्नी माधुरी हिला सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास माहेर नागपूरवरून परत आणले होते. सकाळच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी जिवंत होती. पण नंतर काही वेळाने तिचाही मृत्यू झाला.

Web Title: Six members of the same family died in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.