शिर्शीत सहा महिन्यांनी पुन्हा बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:00 AM2018-04-07T00:00:40+5:302018-04-07T00:00:40+5:30
तालुक्यातील शिर्शी गावात बिबट्याने धुमाकूळ घालून सहा शेळ्यांना ठार केले. पाच-सहा महिन्यांपूर्वी याच गावातील खुशी या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने घरातून उचलून नेण्याची घटना घडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यातील शिर्शी गावात बिबट्याने धुमाकूळ घालून सहा शेळ्यांना ठार केले. पाच-सहा महिन्यांपूर्वी याच गावातील खुशी या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने घरातून उचलून नेण्याची घटना घडली होती. दुसऱ्यांदा पुन्हा बिबट्याने गोठ्यात शिरून सहा शेळ्या मारल्याने गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किसन पुंजाजी निकुरे यांचे कुटुंबीय गुरुवारी रात्री झोपेत असताना सदर घटना घडल्याचे बोलले जाते. शुक्रवारी सकाळी निकुरे कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना गोठ्यातील शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून त्यात निकुरे यांचे २६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी जी.व्ही. धडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्र सहायक बुराडे व शिर्शीचे वनरक्षक शंकर देठेकर करीत आहेत.
त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये
सहा महिन्यांपूर्वी शिर्शी येथील खुशी नामक बालिकेला जेवण्याच्या ताटावरून बिबट्याने उचलून नेले होते. घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले होते. मात्र बिबट पिंजºयात अडकला नाही. दुसºयांदा पुन्हा गावात बिबट्याने प्रवेश करून सहा शेळ्यांना ठार केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती होणार तर नाही ना, अशी भीती गावकºयांना आहे.