रेती तस्करीचे सहा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:38+5:302021-06-05T04:21:38+5:30
तालुक्यातील विहिरगावमूर्ती, विरुर, खांबाडा, बेरडी,टेंबूरवाही, कापणगाव, सुमठाणा, सास्ती, गोवरी, देवाडा आदी नाल्यावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरु असून मोठ्या प्रमाणात ...
तालुक्यातील विहिरगावमूर्ती, विरुर, खांबाडा, बेरडी,टेंबूरवाही, कापणगाव, सुमठाणा, सास्ती, गोवरी, देवाडा आदी नाल्यावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरु असून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. यासोबतच वर्धा नदीच्या चुनाळा, पंचाडा, धिडसी, मारडा घाटातून सुद्धा रेती उपसा सुरू आहे. रेती उत्खनन करण्यासाठी तस्करांनी नदी नाल्यात मोठमोठे खड्डे खोदले आहे. विशेष म्हणजे, रेती तस्करांवर कारवाई करण्याकरिता महसूल विभागाने पथक तयार केले आहे. दरम्यान वर्धा नदीच्या धिडसी व मारडा घाटातून रेती उपसा होत असल्याचे लक्षात येताच तलाठी विनोद खोब्रागडे यांनी त्यावर पाळत ठेवत पहाटे नदी पात्रात धडक देत सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली. या तलाठ्याने निव्वळ टॅक्टर जप्त केले नाही तर त्या तस्करांनी रेती उपसा केलेल्या खड्ड्यांचे मोजमाप करून एक हजार ब्रास रेती चोरीला गेल्याचा पंचनामा करून दंड वसूल करावा असा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला.