मोटेगावात आढळले चितळासह वन्यप्राण्याचे सांगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:23+5:302021-09-27T04:30:23+5:30

शंकरपूर (चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील तथा तळोधी बालापूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत नेरी उपक्षेत्रातील मोटेगाव येथे चितळासह दोन वन्यप्राण्यांचे सांगाडे ...

Skeletons of wildlife including chital found in Motegaon | मोटेगावात आढळले चितळासह वन्यप्राण्याचे सांगाडे

मोटेगावात आढळले चितळासह वन्यप्राण्याचे सांगाडे

Next

शंकरपूर (चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील तथा तळोधी बालापूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत नेरी उपक्षेत्रातील मोटेगाव येथे चितळासह दोन वन्यप्राण्यांचे सांगाडे सापडल्याने वनविभागात खळबळ पसरली आहे. ही घटना शनिवारी मोटेगाव येथील जंगलालगत असलेल्या फुटका तलावावावर उघडकीस आली.

गावातील काही लोक शेतात जात असताना वन्यप्राण्यांचे अवशेष दिसले. याची माहिती तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला चितळांच्या सांगाड्याचा तपास करण्यात आला; परंतु नंतर पुन्हा तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चक्क तलावाच्या सांडव्यात दोन वन्यप्राण्यांचे अवशेष मिळाले; परंतु त्यामधील काही अवयव मिळाले नाहीत. हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वनविभागाने चितळासह इतर वन्यप्राण्यांच्या अवशेषाचा पंचनामा करण्यात आला. या चितळाचा दोन ते तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्राण्यांचे अवशेष जमा करून खड्डा करून गाडण्यात आले. त्यातील काही अवशेष तपासणीसाठी घेण्यात आले असून, नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी मोटेगाव- काजळसर क्षेत्राचे क्षेत्र सहायक रासेकर, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, अजित सुकारे, अतुल सुकारे आदींची उपस्थिती होती.

कोट

वन्यप्राण्यांचा सांगाडा मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे, तसेच काही सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शिकार वाटत नाही. तरीपण सर्वच बाजूंनी तपास करण्यात येणार आहे.

-सी.एल. रासेकर, क्षेत्र सहायक नेरी

Web Title: Skeletons of wildlife including chital found in Motegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.