कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:05 PM2019-01-19T22:05:48+5:302019-01-19T22:06:07+5:30

बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. शिपाई पदाच्या १८६ जागांसाठी २ लाख बेरोजगारांचे अर्ज आले.

Skillful learning will save | कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल

कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल

Next
ठळक मुद्देअभय बंग : महात्मा गांधी विद्यालयात रोजगार मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. शिपाई पदाच्या १८६ जागांसाठी २ लाख बेरोजगारांचे अर्ज आले. विशेष म्हणजे यात ४ हजार पीएचडीधारक विद्यार्थी होते. भारताची सध्या जॉबलेस ग्रोथ सुरू आहे. त्यामुळे कौशल्ययुक्त शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित ‘आरंभ उज्वल भविष्याची वाटचाल’ या व्याख्यानात ते बोलत होते. गडचांदूरचा राजा पब्लिक ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार सुदर्शन निमकर, प्राचार्य गिरीधर बोबडे, सभापती शरद जोगी, विठ्ठल थिपे, धनंजय गोरे, अ‍ॅड. दीपक चटप, विकास भोजेकर उपस्थित होते. डॉ. अभय बंग म्हणाले, युवकांनी विद्यार्थ्यांनी करिअर कसे निवडावे? आयुष्यामध्ये काय करावे? स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी काय गरजेचे आहे, याचा विचार केला पाहिजे. जीवनात अनेक अडचणी येतात. पण निराश न होता सकारात्मक विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. डॉ. बंग यांनी तरूणाईने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. माजी आमदार चटप म्हणाले, युवकांनी शासकीय नोकरीपेक्षा शेती व उद्योगाकडे वळले पाहिजे. सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य हा पर्याय असल्याचेही त्यांनी नमुद केले. प्राचार्य बोबडे, दीपक चटप, अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकासासंबंधी माहिती दिली.
प्रास्ताविक सुयोग कोंगरे, संचालन अ‍ॅड. दीपक चटप यांनी केले. आभार प्रवीण सातभाई यांनी मानले. अभिलाष तुराणकर, अक्षय मेंढी, गणेश कवलकर, सचिन सातभाई, मिथून देवकर, मंगेश कवलकर, सारंग मेंढी, नितेश डाखरे, अजित कोरे, अमित मांडवकर, चेतन सैताने, उमेश भांजेकर, अमित पारखी, देवानंद मून आदींनी सहकार्य केले.

Web Title: Skillful learning will save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.