कन्नमवारांसारखे कौशल्यप्राप्त विद्यार्थी तयार व्हावेत - मुनगंटीवार
By Admin | Published: January 10, 2015 10:51 PM2015-01-10T22:51:36+5:302015-01-10T22:51:36+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी उद्योगपतींकडे लक्ष न देता गरिबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते कर्मवीर झाले. तसेच आपण सुद्धा
मूल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी उद्योगपतींकडे लक्ष न देता गरिबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते कर्मवीर झाले. तसेच आपण सुद्धा आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कौशल्यप्राप्त करावे व मोठे व्हावे असे मनोगत अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक कर्मवीर महाविद्यालयात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अनुदान उपयुक्त आहे’ या विषयावर आयोजित विद्यापिठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी अॅड. बाबासाहेब वासाडे होते. यावेळी संस्थेच्या वतीने ना. मुनगंटीवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे यांनी तर संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, अनिल वैरागडे आदी उपस्थित होते.
चंद्रपुरातही आदरांजली
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. आदर्श महिला मंडळाच्या वतीने प्रभा चिलके, भारती नेरलवार, शेफाली कुमरवार, निलीमा कोकुलवार, ममता पुल्लावार, साधना नेरलवार, वर्षा जकुलवार, संगिता चिनेवार, वसंत आकुलवार, मधु घंटावार, जगदिश नेरलवार,राजेश नेरलवार, साचेवार, बत्तुरलवार यांनी जटपुरा परिसरातील कन्नमवार यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण केली.