सेल्फीचा नाद करायचा नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:38 PM2019-05-21T22:38:49+5:302019-05-21T22:39:43+5:30
मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.
कुठलेही भान न ठेवता कोणत्याही क्षणी व अकारण होणारे सेल्फी चित्रण सध्या समस्या ठरत आहे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमात सेल्फीच्या नादात होणाऱ्या बेभान हालचाली संशोधनाचा विषय ठरत आहे.
लग्न समारंभासारखे आनंदाचे क्षण असो किंवा दु:खद घटना. त्याचे होणारे चित्रण म्हणजे एक प्रकारची अवहेलना होताना दिसत आहे. यामुळे आपला मोबाईल प्रोफाईल तर छान निघतील पण व्यक्तीगत प्रोफाईल खरब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा विषय आता काही नवीन नाही, त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान म्हणजे पर्वणी, मॉडर्न युगात तंत्रज्ञान माणसाला मिळालेले वरदान आहे. याला चांगल्या प्रकारे वापरल्यास त्याचा फायदा होतो. मात्र अतिरेक केला तर त्यापासून नुकसानही होते. प्रत्येकाने आपापल्या परीने असलेल्या साधनांचा वापर करुन पाहिजे त्यावेळी हवे तेवढे फोटो काढणे फॅशन झाली आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी सारखे रोल खराब व्हायची भीती पण नाही. हवे तेवढे काढा आणि पाहिजे तेवढे ठेवून बाकीचे डिलीट करता येतात. यामुळे नुकसान किंवा फायद्याची भीतीची नाही. लग्न समारंभात जाण्याचा योग हल्ली वाढला आहे. वर-वधूचे होणारे छायाचित्रण समजण्यासारखे आहे. पण वर-वधूच्या मंचावर येणारे युवक- युवतीचे सुरु असलेले सेल्फी प्रदर्शन चाळयासारखे वाटतात. एकीकडे होणारी धार्मिक विधी आणि दुसºया बाजूला होणारे सेल्फी चित्र हास्यास्पद तेवढेच लाजिरवाना प्रकार वाटतो.
बेभान क्लिक
एखाद्या समारंभात पाहूने मंडळीची रेलचेल आणि सेल्फी काढणाऱ्यांची बेभान क्लिक हसू तेवढे राग आणणारे असते. विशेष म्हणजे, या सेल्फीच्या नादात कित्येक अपघात घडले आहेत. वाहन चालविताना किंवा धोकादायक जागेवर उभे राहून सेल्फी काढल्याने जिवावरही बेतले आहे.