सवलतधारकांवर ‘स्मार्टकार्ड’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:36 PM2019-07-08T22:36:26+5:302019-07-08T22:36:47+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व इतर विविध घटकांतील व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी चार हजार आणि पत्रकारांसाठी आठ हजार कि.मी. प्रवासाची मर्यादा घालून दिली आहे.

'Smartcard' Watch on Discountholders | सवलतधारकांवर ‘स्मार्टकार्ड’चा वॉच

सवलतधारकांवर ‘स्मार्टकार्ड’चा वॉच

Next
ठळक मुद्देकार्ड वाटप मोहिमेला सुरुवात : प्रवास अंतराचे पाळावे लागणार बंधन

राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व इतर विविध घटकांतील व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी चार हजार आणि पत्रकारांसाठी आठ हजार कि.मी. प्रवासाची मर्यादा घालून दिली आहे. पण, या मर्यादा सवलतीचा लाभ घेणाऱ्यांकडून नियम पाळल्या जाते का, याची शहानिशा करण्यासाठी महामंडळाने आता ‘स्मार्ट कार्ड’ वाटप करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
एसटी महामंडळाची लालपरी राज्यभरातील सर्वच रस्त्यांवर धावत धावते. शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ६६ टक्के प्रवास भाड्यात सवलत दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मुले शहरात येऊन शिक्षण घेत आहेत. मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत प्रवास करण्याची सवलत योजना सुरू आहे. महामंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिक, अर्जुन, द्रोणाचार्य, शिवछत्रपती व दादाजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त व्यक्ती व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत देते. ही सवलत वर्षाकाठी फक्त आठ हजार किलोमीटर अंतराची आहे.
प्रवास सवलत घेणारे ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींना किलोमीटरची जाणीव करून देण्यासाठी महामंडळाने आता स्मार्ट कार्ड विकसित केले आहे. महामंडळाची सवलत घेणाºया प्रत्येक व्यक्तींना हे कार्ड उपलब्ध केले जाणार आहे. या कार्डमध्ये पास, ट्रॅव्हल व शॉपिंग वॉलेटचा समावेश असणार आहे. जिल्हाभरातील प्रत्येक आगारात सवलतदारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्याचे काम सध्या जोमाने सुरु आहे. हे कार्ड उपलब्ध झाल्यास सवलतदारांनी किती किलोमीटर प्रवास केला, याचा हिशेब या कार्डाद्वारे समजणार आहे. किलोमीटरची मर्यादा पूर्ण केल्यास पुढील प्रवासासाठी मात्र सवलतदारांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा महामंडळाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
महामंडळ आर्थिक तोट्यातच
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. वर्षभरात फक्त चार हजार किलोमीटरपर्यंतच प्रवास करण्याची मर्यादा घातली आहे. ही सवलत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे महामंडळाच्या लालपरीचा क्षुल्लक कामांसाठी लाभ घेऊ लागले आहे. राज्यभरातील देवदर्शन, लग्नकार्य, पर्यटन क्षेत्र आदी ठिकाणी जाण्यासाठी महामंडळाच्या लालपरीचा आसरा घेतला जात आहे. अशा परिस्थितीत महामंडळाने घातलेली चार आणि आठ हजार किलोमीटरची मर्यादा कुणाच्याही लक्षात येत नाही. परिणामी महामंडळाच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. मात्र, म्हणावा असा आर्थिक फायदा महामंडळाला झाला नाही. त्यामुळे महामंडळ आर्थिक तोट्यातून अजुनही बाहेर आले नाही.

Web Title: 'Smartcard' Watch on Discountholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.