कोरोना उद्रेकातही ‘त्या’ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:59+5:302021-06-22T04:19:59+5:30

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव होता. रुग्णांना बेड्स आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी ...

The smile on the face of 'those' patients even in the corona eruption! | कोरोना उद्रेकातही ‘त्या’ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

कोरोना उद्रेकातही ‘त्या’ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

Next

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव होता. रुग्णांना बेड्स आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत होता. अशा कठीण काळात एचआयव्ही एड्स रुग्णांच्या औषधींचा डोस चुकणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे ठरले असते. मात्र, एआरटी केंद्रातील नोंदणीकृत रुग्णांच्या घरी मोफत औषधे पुरविण्याचे काम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने यशस्वीरित्या पूर्ण केले. परिणामी एचआयव्ही रुग्णांचा एआरटी औषधांमध्ये खंड पडला नाही.

गतवर्षी कडक लॉकडाऊन लागू झाल्यानंतर एचआयव्ही रुग्णांच्या घरी औषधे पोहोचविण्याचा प्रश्न पुढे आला होता. त्यावर मात करून संभाव्य संकटे लक्षात घेऊन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाकडून नव्याने आखणी करण्यात आली होती. गतवर्षातील कडक लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. एआरटी वाटपाची प्रक्रियाही केंद्रातून सुरू झाली. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा काही निर्बंधांसह लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. व्यवहार ठप्प झाले. एचआयव्ही रुग्णांबाबतीतही पूर्वीचीच स्थिती निर्माण झाली. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात या अडचणी दूर झाल्या. एआरटी केंद्र चंद्रपूर आणि संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प व विहान चंद्रपूर प्रकल्पांनी संयुक्त नियोजन करून सर्व तालुक्यातील एचआयव्ही रुग्णांना घरपोच औषधे पुरविली. यासाठी तालुका स्तरावरील आयसीटीसी केंद्रांची मोठी मदत झाली. वायआरजी या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या सहयंत्रणांकडून काही कालावधीसाठी वाहन उपलब्ध करून दिले. या मोहिमेसाठी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, एआरटी कर्मचारी हेमचंद उराडे, मराठे, विहानच्या संगीता खंडाळकर व आयसीटीसी समुपदेशक तसेच एआरटी केंद्रातील कर्मचाऱ्यांचेही पाठबळ उपयोगी ठरले.

अशी झाली मोहीम यशस्वी : सुमंत पानगंटीवार

आयसीटीसी समुपदेशक, लिंक वर्कर प्रकल्प व विहान प्रकल्प कर्मचाऱ्यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार कोरोना उद्रेक लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर नियोजन केले. एचआयव्ही रुग्णांजवळील औषधे या काळात संपणार आहेत अशांचा प्राधान्यक्रम ठरविला. मोबाईलद्वारे संपर्कात राहून रुग्णांच्या घरी औषधे पोहोचली. कोरोनाविरूद्ध लढा कसा द्यायचा, याबाबतही समुपदेशन केले. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कटिबद्ध आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी स्तरावरूनही मार्गदर्शन लाभले, अशी माहिती जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी दिली.

कोट

एआरटी केंद्राकडून औषधांच्या वाटपाचे कार्य निरंतर सुरू असते. निर्बंध काळात प्रक्रिया खंडित होण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या सूचनांची सर्व संस्थांनी प्रभावी अंमलबजावणी केली. मोबदल्याची अपेक्षा न करता लिंक वर्करने रुग्णांच्या घरी जाऊन औषधे पोहोचविली. यापुढेही अशा सेवांमध्ये तत्पर राहू.

-रोशन आकुलवार, डीआरपी, लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर

Web Title: The smile on the face of 'those' patients even in the corona eruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.