महसूल व वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:22+5:302021-03-04T04:52:22+5:30

येथील महसूल व वनाधिकारी हाताशी धरून खडसंगी परिसरात मागील काही दिवसापासून अवैध रेती तस्करी जोरात सुरू आहे. यावर ...

Smuggling of sand by revenue and forest officials | महसूल व वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करी

महसूल व वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करी

Next

येथील महसूल व वनाधिकारी हाताशी धरून खडसंगी परिसरात मागील काही दिवसापासून अवैध रेती तस्करी जोरात सुरू आहे. यावर कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाही केल्या जात नाही. यामुळे महसूल व वनाधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

खडसंगी येथे प्रत्येक वनाधिकाऱ्यांचे दालन आहेत. वनविकास महामंडळ, ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर झोन, तलाठी यांची कार्यालये आहेत. तरीही खडसंगी येथे मुरपार येथील ब्रह्मपुरी प्रादेशिक आरक्षित जंगलातून लाखो ब्रास रेती तस्करी ट्रॅक्टरने रात्रीला सुरू आहे. आरक्षित जंगलातील वनसंपत्ती रक्षणासाठी महसूल व वनाधिकाऱ्यांना गस्त करण्यासाठी शासनाने चारचाकी वाहन दिलेले आहे. भरदिवसा रेती तस्करी होत होते. मात्र अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याचा प्रत्यय येथील जनतेला येत आहे. रेती तस्करांनी अंगावर ट्रॅक्टर चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे.

Web Title: Smuggling of sand by revenue and forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.