चंद्रपूरच्या जंगलातून सागवान लाकडांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:29 AM2017-11-15T10:29:26+5:302017-11-15T10:33:15+5:30
जंगलातून रात्रीला सागवान लाकडाची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जंगलातून रात्रीला सागवान लाकडाची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ट्रॅक्टरसह ५९ हजार ८०० रुपये किमतीचे १२९ घनमीटर सागवान लाकूड जप्त करण्यात आले.
तळोधी (बा.) वनपरीक्षेत्राअंतर्गत देवपायली - बालापूर बिटात मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान ट्रॅक्टरने सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. नवेगाव पांडव येथील मार्तंडराव सखाराम कापगते (३६) हे लाकूड आपल्या घरी घेऊन जात होते. सोबत मजूर मुकेश काशीनाथ गुरूनुले (३१) , ईश्वर महादेव हिवरकर (४५), सुनील धोंडू बावणे (३२) होते. या चारही जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाष सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक ए.जी. नेवारे , नन्नावरे, एस.बी. चौधरी, जी.एम. गायकवाड यांनी केली.