कर्मवीर महाविद्यालयात सर्प जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:42+5:302021-02-18T04:50:42+5:30
मूल : येथील कर्मवीर महाविद्यालयात अकरावी व बारावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी संजीवन पर्यावरण संस्था मूलतर्फे सर्प जनजागृती कार्यक्रम ...
मूल : येथील कर्मवीर महाविद्यालयात अकरावी व बारावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी संजीवन पर्यावरण संस्था मूलतर्फे सर्प जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे विषारी, बिनविषारी सापांची माहिती सर्पमित्र तथा संजीवनी पर्यावरण संस्था मूलचे संचालक उमेशसिंह झिरे यांनी सविस्तर समजावून सांगितली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानवी जीवनात निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य केवल कऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रा. दहीवले, प्रा. शेलेकर, प्रा. बोधे व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य स्वप्नील आक्केवार, अंकुश वानी, प्रतीक लेनगुरे, संकल्प गणवीर, जय मोहुर्ले, यश मोहुर्ले, अनुराग मोहुर्ले, रितेश पिजदुरकर, हर्षल वाकडे आदी उपस्थित होते.