आतापर्यंत १८ हजार ५२३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:31+5:302020-12-06T04:30:31+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १५० जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार ५२३ पर्यंत ...

So far 18 thousand 523 corona free | आतापर्यंत १८ हजार ५२३ कोरोनामुक्त

आतापर्यंत १८ हजार ५२३ कोरोनामुक्त

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १५० जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार ५२३ पर्यंत पोहोचली आहे. शनिवारी ७९ बाधिंतांची नव्याने भर पडली तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ६८६ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत एक हजार ८३८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५४ हजार ८२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३१ हजार ८१८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितांमध्ये राणी लक्ष्मीबाईं वार्ड बल्लारपूर येथील ६४ वर्षीय पुरुष व चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ भागातील ४७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील २९३, तेलंगणा, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपुरात सर्वाधिक रूग्ण

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या ७९ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २९, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील तीन, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, सिंदेवाही आठ, मूल तीन, गोंडपिपरी दोन, राजुरा सात, चिमूर सहा, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: So far 18 thousand 523 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.