आतापर्यंत ७५ हजार ४८३ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:30+5:302021-05-26T04:29:30+5:30
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८१ हजार ५१२ वर पोहोचली आहे. सध्या ४ हजार ६२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८१ हजार ५१२ वर पोहोचली आहे. सध्या ४ हजार ६२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ५९ हजार ४९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ७५ हजार ८९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १४०२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्र्रपूर जिल्ह्यातील १२९९, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३७, यवतमाळ ४७, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील रामपूर येथील ५५ वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील ७२ वर्षीय महिला, ४८, ५० व ७२ वर्षीय पुुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ६५ वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील इंदिरा नगर येथील ८५ वर्षीय पुुरुष, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ८० वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ८०
चंद्रपूर तालुका २४
बल्लारपूर २१
भद्रावती १४
ब्रह्मपुरी ०२
नागभीड १२
सिंदेवाही ०४
मूल ०८
सावली ०२
पोंभूर्णा ०३
गोंडपिपरी ०२
राजुरा २२
चिमूर ०२
वरोरा ११
कोरपना २०
जिवती ०५
अन्य ०२