आतापर्यंत ८० हजार १४० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:00+5:302021-06-05T04:22:00+5:30

आज एकूण ४१८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५० पॉझिटिव्ह तर ४०३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ...

So far, 80,140 people have been released from coronation | आतापर्यंत ८० हजार १४० जण कोरोनामुक्त

आतापर्यंत ८० हजार १४० जण कोरोनामुक्त

Next

आज एकूण ४१८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५० पॉझिटिव्ह तर ४०३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ३७८ वर पोहोचली आहे. सध्या एक हजार ७६३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ३३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ९७ हजार ४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४७५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३६५, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३९, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील ७१ वर्षीय पुरूष, मामला येथील ४१ वर्षीय पुरूष, बल्लारपूर तालुक्यातील ६५ वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील साखरा येथील ६५ वर्षीय पुरूष, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नागरिकांनी त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपुरात फक्त ३६ रूग्ण आढळले

बाधित आलेल्या १५० रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ३६, चंद्रपूर तालुका १६, बल्लारपूर ५, भद्रावती २१, ब्रह्मपुरी ९, नागभीड १, सिंदेवाही १०, मूल १४, सावली शुन्य, पोंभूर्णा ६, गोंडपिपरी ३, राजूरा ३, चिमूर २, वरोरा १५, कोरपना ६, जिवती १ व इतर ठिकाणच्या २ रूग्णांचा समावेश आहे.

Web Title: So far, 80,140 people have been released from coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.