नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:02+5:302021-06-04T04:22:02+5:30
चंद्रपूर : कोरोना काळात नागरिकांना बाहेर जाणे कठीण झाले आहे. गरजू नागरिकांना अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. शिधापत्रिका ...
चंद्रपूर : कोरोना काळात नागरिकांना बाहेर जाणे कठीण झाले आहे. गरजू नागरिकांना अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. शिधापत्रिका काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी गरजू नागरिकांना शिधा पत्रिका काढून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी कागदपत्र गोळा करणे सुरु केले आहे.
कोरोना महामारीने गेल्या वर्षाभरापासून गरजू नागरिकांच्या हातचा रोजगार गेला असून काहींवर उपासमारीची वेळ आली. या संदर्भात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना सुध्दा अन्नधान्य देण्यात यावे बाबतचे पत्र माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उपमहापौर राहुल पावडे यांनी दिले होते. हा उपक्रम कोरोना काळापासून पावडे यांच्या कार्यालयातून राबविण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात अन्नधान्याची किटसुध्दा उपलब्ध करून देण्यात आली. सदर उपक्रम राबवित असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.