अन्नदानातून सामाजिक बांधिलकी
By admin | Published: January 10, 2015 10:51 PM2015-01-10T22:51:57+5:302015-01-10T22:51:57+5:30
प्राणाची बाजी लावून सैनिक देशसेवा करतात. आपलेही योगदान देशासाठी असावे, यास्तव विदर्भातील तरुण सध्या सैन्यभरतीसाठी चंद्रपुरात दाखल झाले आहे. मात्र त्यांच्या राहण्यासह
चंद्र्रपूर : प्राणाची बाजी लावून सैनिक देशसेवा करतात. आपलेही योगदान देशासाठी असावे, यास्तव विदर्भातील तरुण सध्या सैन्यभरतीसाठी चंद्रपुरात दाखल झाले आहे. मात्र त्यांच्या राहण्यासह भोजनाची व्यवस्था नसल्याने अनेकवेळा मिळेल त्या ठिकाणी राहून सैन्य भरतीची चाचणी देत आहे. भावी सैनिकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी येथील काही संस्था समोर आल्या आहे.
ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघानेही यात पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या तरुणांच्या भोजनाची जबाबदारी त्यांनी स्विकारून अन्नदानाची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ६ जानेवारीपासून सैन्य भरती सुरु आहे. येणाऱ्या तरुणांच्या भोजनासाठी येथील ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघाने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर स्टॉल उभारून जेवणाची व्यवस्था केली आहे. एक दोन दिवस नाही तर १२ दिवस त्यांची ही मोहिम सुरु राहणार आहे.
या माध्यमातून ते किमान ४० हजार तरुणांना भोजनदान करणार आहे. यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूलने मैदान दिले आहे. महानगरपालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतेची जबाबदारी घेतली आहे.
यासाठी ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रदीप जानवे, दीपक जेऊरकर, अरुण येरावार, स्वामी कापरबोयना, शेखभाई, प्रशांत उपगन्लावार, श्याम थेरे, मु्न्ना ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, विठ्ठल दुरटकर, मकरंद खाडे, प्रकाश सुर्वे, राहूल पावडे आदी सहकार्य करीत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सदर उपक्रम नागरिकांना प्रेरणा देणारा असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)