आॅटोरिक्षा चालकांचे सामाजिक योगदान भूषणावह -अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:40 PM2017-08-21T22:40:18+5:302017-08-21T22:40:43+5:30
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी स्वीकारत समाजाला काही द्यावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी स्वीकारत समाजाला काही द्यावे, अशा उदात्त भावनेतून महाराष्टÑ आॅटोरिक्षा चालकमालक संघटना मागील अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे. संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पाणपोई, गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, गुणवंताचा सत्कार याबरोबरच धार्मिक व राष्टÑीय कार्यासही आॅटो चालकांनी सदैव हातभार लावला आहे. खºया अर्थाने हे कार्य विविध क्षेत्रात कार्य करणाºयांसाठी प्रेरणा देणारे आहे. या कार्यामध्ये सातत्य ठेवून समाजाला उपकारक ठरेल असे कार्य यापुढेही संघटनेच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
संघटनेच्या मध्य रेल्वे चंद्रपूर येथील स्टॅन्ड नं. १ च्या आॅटोरिक्षा फलकाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, मोहन चौधरी, राजू येले, कामगार नेते रमेश बल्लेवार, आॅटोरिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हा सचिव बळीराम शिंदे, उपाध्यक्ष मधूकर राऊत, अब्बास भाई, स्टेशन प्रबंधक रामलाल सिंह, रेल्वेचे के. के. सेन आदी उपस्थित होते.
चंद्रपूर महानगरामध्ये आॅटो व्यवसायात अनेक सुशिक्षित युवक असून त्यांना सामाजिक भान असल्यानेच समाजासाठी आपल्या अर्थार्जनातून काही देता यावे, ही भावनाच आॅटोरिक्षा चालकांच्या अशा सेवेला बळ देत असल्याचे सांगतानाच प्रवासी हाच आपल्या अर्थार्जनाचे मुळ साधन असल्याने त्यांना समाधान मिळेल अशा पद्धतीची वर्तणूक आॅटो चालकांनी ठेवतानाच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही ना. अहीर यांनी केले.
यावेळी महापौर अंजली घोटेकर यांनीही चंद्रपूर महानगरातील आॅटो चालक संघटनेद्वारा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल प्रशंसा केली.
त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्रींच्या हस्ते आॅटोरिक्षा स्टॅन्ड फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेचे योगेंद्र देशभ्रतार, शेख जिब्राईल, गंगाधर तामगाडगे, सैय्यद सारीक, शंकरराव थोरात, असलम खान पठाण, शेख गफ्फूर, रविंद्र देशभ्रतार, माधव भगत, प्रभाकर जामनकर, पे्रमदास किटे, दिनेश मोरघडे, देवेंद्र मून, मिलिंद आमटे, विकास सिंगारे, अकबर अली, रमेश मोहुर्ले, मधूकर गुजरकर, शेख सलमान, राकेश पवार, राकेश मूळे, शेख मुजफ्फर, शेख शकील आदी उपस्थित होते.