देशाची वाटचाल सामाजिक न्यायाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:47 AM2019-04-04T00:47:14+5:302019-04-04T12:55:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय न्यायदृष्टीने देशाच्या विकासाला दिशा देत सामाजिक न्यायासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यामुळे देशात सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे,

Social Justice to the country's journey | देशाची वाटचाल सामाजिक न्यायाकडे

देशाची वाटचाल सामाजिक न्यायाकडे

Next
ठळक मुद्देरामदास आठवले : बाबूपेठ येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय न्यायदृष्टीने देशाच्या विकासाला दिशा देत सामाजिक न्यायासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यामुळे देशात सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रिपाइं (आ.) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
भाजपा- शिवसेना - रिपाइं (आ.) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या बाबूपेठ येथील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी भाजपा उमेदवार हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे, रिपाइंचे थुल, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, रिपाई (आ.) जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, अशोक घोटेकर, जयप्रकाश कांबळे, नगरसेवक राजेश मून, राजू भगत, राजू जंगम, नगरसेविका ज्योती गेडाम, जितेंद्र धोटे आदींची उपस्थिती होती. रामदास आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आहे.
या आघाडीमध्ये जावून सत्ता मिळणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशात पुन्हा सत्ता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे यांचीही भाषणे झालीत.

Web Title: Social Justice to the country's journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.