मतमोजणीदरम्यान जोपासले सामाजिक दायित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:43+5:302021-01-21T04:25:43+5:30
गोंडपिपरी येथील तालुका क्रीडांगणात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होती. याकरिता ४३ गावांतील हजारो नागरिक सकाळपासूनच दाखल झाले होते. आपला ...
गोंडपिपरी येथील तालुका क्रीडांगणात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होती. याकरिता ४३ गावांतील हजारो नागरिक सकाळपासूनच दाखल झाले होते. आपला उमेदवार विजयी होणार, या आशेने आलेल्या या हजारो नागरिकांना चंदेल यांनी दिलासा दिला. गावातील युवकांना सोबत घेऊन अडीचशे क्विटंल मसाला भाताचे वितरण केले. सोबत पिण्याच्या शुध्द पाण्याचीही व्यवस्था केली. चंदेल हे येथील प्राची गॅस एजन्सीचे संचालक आहेत. ते अनेकांच्या मदतीला धाऊन जातात. नुकतेच गोंडपिपरीत क्रीडा सामना पार पडला. स्पर्धेत हरियाना, पुणे, सातारा, धुळे येथून खेळाडू आले होते. त्यांच्या निवासाकरिता आपले होस्टेल उघडे करून सहकार्य केले होते. कबड्डी सामने यशस्वी करण्यासाठी मदत केली. मतमोजणीदरम्यान दीड हजार नागरिकांची भूक भागविली. या उपक्रमासाठी किरण झाडे, रोहित पुण्यप्रेडडीवार, बबलू फलके, राकेश झाडे, चेतन यशवंतवार यांच्यासह अनेक तरुणांनी मदत केली.