चार वर्षांपासून मोबदल्यासाठी धडपडतोय समाजसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:33 AM2021-09-17T04:33:14+5:302021-09-17T04:33:14+5:30
संजीवनी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र तळोधी बा. येथे जनकापूर येथील वंसत मुखरुजी मेश्राम हे १९९८ मध्ये समाजसेवक व ...
संजीवनी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र तळोधी बा. येथे जनकापूर येथील वंसत मुखरुजी मेश्राम हे १९९८ मध्ये समाजसेवक व सल्लागार या पदावर कार्य करीत होते. तब्बल १९ वर्षे व्यसनमुक्ती केंद्रात सेवा करूनही संस्था अध्यक्षाने नवीन नियमावलीनुसार तुमचे पद बसत नाही, या कारणामुळे संस्थेमधून त्यांना नोटीस देऊन काढण्यात आले; परंतु शासनाच्या नियमानुसार सल्लागार, समाजसेवक व मानसशास्त्रज्ञ ही तीन पदे अस्तित्वात होती; परंतु नवीन नियमानुसार तीन पदांपैकी दोन पदे भरायची आहेत. या कारणावरून १९ वर्षे सेवा केल्यानंतर सुद्धा या संस्थेच्या वतीने काढण्यात आले. त्यामुळे वयाच्या ५० व्या वर्षी आपण आता कुठे जाणार, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या कुटुंबामध्ये सात सदस्य असून नोकरी नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. १९ वर्षे सेवा करीत असताना पी.एफ.मध्ये सुद्धा माझे नुकसान केलेले आहे. संस्थेकडे आजपर्यंत माझी १० लाख रुपये थकबाकी आहे, असेही ते म्हणाले. आपणाला योग्य न्याय देण्यात येऊन कामाचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी वंसता मेश्राम यांनी केली आहे.