सौर कुंपणातून होणार शेतपिकाचे रक्षण

By Admin | Published: July 16, 2015 01:21 AM2015-07-16T01:21:57+5:302015-07-16T01:21:57+5:30

देशाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्याला कधी निसर्ग तर कधी व्यापारी नाडवतात.

Solar fencing will help protect the farm | सौर कुंपणातून होणार शेतपिकाचे रक्षण

सौर कुंपणातून होणार शेतपिकाचे रक्षण

googlenewsNext

ब्रह्मपुरी वनविभागाचा उपक्रम : संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या गावात देणार सौर कुंपण
खडसंगी : देशाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्याला कधी निसर्ग तर कधी व्यापारी नाडवतात. त्यामुळे शेतकरी सदा आर्थिक संकटात असतो तर शेतात लावलेली पिके हातात येण्याच्या आधीच जंगली जनावराद्वारे नष्ट करतात. त्यामुळे हवालदील शेतकऱ्याला शेतपिकाच्या रक्षणासाठी सौरकुंपन ७५ टक्के सुटीवर देण्यात येणार आहे. वन विभागाच्या माध्यमातून ही योजना चिमूर वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्या असलेल्या गावात राबविण्यात असून सौर कुंपणामुळे जंगलालगत असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यापासून रक्षण होणार आहे.
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रालगत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. या जंगलालगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसुद्धा जंगला लगतच आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र वनविभागाकडून अल्प प्रमाणात मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. या मदतीकरिता शेतकऱ्यांना अनेकदा वनविभागाचा पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामध्ये अनेक शेतकरी त्रस्त होवून मदतीवर पाणी फेरतात.
जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या रक्षणासाठी जांगल करावी लागते. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन जीव गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरी मात्र शेतकरी जीव मुठीत घेऊन आपली वर्षभराची पूंजीच्या रक्षणासाठी शेतावर जागलीला जातात.
वनविभागाकडून देण्यात येणारे सौर कुंपन केल्यास अशा शेतकऱ्यांची जागल करण्यापासून सुटका होणार असून शेतकरी सुखाने बिनधास्त घरी झोपू शकतील. चिमूर वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती असलेल्या गावात सौर कुंपन देण्यात येणार आहे. या सौर कुंपनाची मुळ किंमत बारा हजार ५०० रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांना ७५ टक्के सुटीवर हे सौर कुंपण देण्यात येणार आहे. याकरिता ज्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यरत आहेत अशा गावाचा प्रथम समावेश करण्यात आला आहे.
चिमूर क्षेत्रात सोनेगाव (वन) शिवापूर (बदर), शेडेगाव उरकुडपार, लावारी (भिसी) नवेगाव (रमण) शंकरपूर ईरव्हा, डोंगरगाव आणि झरी या गावापैकी उरकुडपार येथील ३५ शेतकऱ्यांनी या सौर कुंप्ण योजनेची रक्कम वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सचिवाकडे जमा झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उरकुडपार येथे शेतकऱ्यांच्या शेतात सौर कुंपन लावण्यात येणार आहे.
सौर कुंपण उपक्रमाकरिता ब्रह्मपुरी वनविभागाने मुकेश सोलर सिसीम या कंपनी सोबत करार केला असून या सोलर युनिटमध्ये १२ व्हॅटची इलेक्ट्रीक बॅटरी तर २५ वॅटची सोलर पॅनल राहणार आहे.
हे युनिट १८ ते २४ तास काम करणार असून या सौर कुंपणापासून कुठलीही हानी होणार नसून फक्त प्राण्यांना (झीन- झीन्या) मोदरा येणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा प्राणी शेतात येणार नसल्याचे मुकेश सोलर सिस्टीमच्या संचालकांनी ‘लोकमत’शी बोलतना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Solar fencing will help protect the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.