सोलर कुंपण करणार शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:01+5:302021-03-04T04:54:01+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या पळसगाव, मदनापूर, गोंड मोहाळी, बेलारा, विहीरगाव, कोलारा व देवळी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या पळसगाव, मदनापूर, गोंड मोहाळी, बेलारा, विहीरगाव, कोलारा व देवळी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे वन्यप्राण्यांच्या वाढत्या धुडघुसामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त व्हावा, यासाठी वनविभागाची सोलर कुंपण देण्याची योजना असून. सोलर कुंपणसाठी सहा हजार रुपये भरावे लागतात. परंतु आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भरणे अवघड होत असल्याने या योजनेपासून शेतकरी यांना वंचित रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन उपसरपंच गजानन गुळधे यांनी त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आमदार बंटी भांगडिया यांना सोलर योजनेची सविस्तर माहिती दिली.
आमदार भांगडिया यांनी तात्काळ त्या शेतकऱ्यांना अर्धा हिस्सा देऊन आर्थिक सहकार्य केल्याने सोलर कुंपण मिळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान होणार नाही आणि उत्पन्न वाढून आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.