ंडिमांड भरूनही सौर पंप मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:40 AM2019-07-29T00:40:13+5:302019-07-29T00:41:02+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला.
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अर्ज तसेच डिमांड भरूनही सौर कृषीसंचच दिल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
या योजनेनुसार कृषी पंपासोबत दोन एलईडी बल्ब, एक डिसी पंखा, व एक मोबाईल चार्जिग सॉकेट देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा होईल, या आशेने मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले. काहींना डिमांड भरण्याचे पत्र आले. त्यानंतर डिमांडही भरण्यात आली. प्रथम बोअरवेलसाठी शेतकऱ्यांनी पैसा खर्च केला. त्यानंतर डिमांड भरली. आतातरी सौर पंप शेतात लागेल आणि सिंचनाची सुविधा होईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आता न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतात लाखो रुपये खर्च करून बोअरिंग लावली. मुख्यमंत्री सौर पंप योजनेंतर्ग डिमांडच्या माध्यमातून रक्कम भरली. शेतीच्या हंगामात सौर पंप कामात येऊन सिंचनाची व्यवस्था होईल, असे वाटले. मात्र हंगामात सौर पंप मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. वीज कंपनीकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तॅ
-संतोष सोनवणे,
शेतकरी चक्क कोंसबी
मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी मुल तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १७ जणांनी डिमांड भरले आहेत. सौर पंपासाठी तीन कंपण्याची निवड करण्यात आली आहे. डिमांड भरल्यानंतर मोबाईलवर काही दिवसांनी मॅसेज येतो. त्यानंतर कंपनीची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर कंपनी शेतकऱ्यांच्या शेतात पहाणी करून सौर पंप लावून देते. यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येईल.
- चंदनसिंह चौरसिया,
उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.कंपनी मूल