ग्रामसेवकांच्या समस्या निकाली काढणार

By admin | Published: November 12, 2016 12:54 AM2016-11-12T00:54:21+5:302016-11-12T00:54:21+5:30

सोमवारपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा शाखा चंद्रपूरच्यावतीने ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यासाठी ...

To solve the problem of Gramsevak | ग्रामसेवकांच्या समस्या निकाली काढणार

ग्रामसेवकांच्या समस्या निकाली काढणार

Next

एम.डी.सिंह : ग्रामविकासाला प्राधान्य द्यावे
चंद्रपूर : सोमवारपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा शाखा चंद्रपूरच्यावतीने ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्याची जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यांशी नुकतीच बैठक पार पडली.यावेळी ग्रामसेवकांच्या सर्व समस्या निकाली काढणार असुन, ग्रामसेवकांनी ग्रामविकासाला प्राधान्य द्यावे . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी सिह यांनी केले.
यावेळी ग्रामसेवक संघटनेकडून एकुण २७ प्रलंबित मांगण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रलंबित मागण्यापैकी ९० टक्के मागण्या तात्काळ मंजुर करण्याचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिले आहे. उर्वरित मागण्या पुर्ण करण्याविषयी पुढील काळात पुर्ण चर्चा केल्या जाणार आहेत. २०३ ग्रामसेवकांना नोव्हेंबर अखेर नियमित करणार असुन, तसे आदेश निर्गमित करण्याच्या सुचना संबंधित विभागास देण्यात आल्या. महात्मा गांधी राष्ट्रिय रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतीकडे नदेता जिल्ह्यायील ईतर उपलब्ध यंत्रणेकडुन घेण्याबाबत शासन स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अगोदरच कळविले आहे. शासनाकडुन थेट ग्रामविकासाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत असल्यामुळे, पंचायत स्तरावर ई-टेंडरिंग करण्याकरिता ग्रामपंचायतीची डिईसी तयार करावी. यात अडचण असल्यास जिल्हा परिषदच्या आयटी सेलकडून योग्य मार्गदर्शन घेण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी बैठकीला ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चे विषयी व दिलेल्या आश्वासना विषयी समाधान व्यक्त केले. याशिवाय संघटनेच्या आणखी काही समस्या असल्यास पुढिल १५ दिवसात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याच्या सुचना संबधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी एच डी बागडे, प्रफुल्ल गेडाम, पदमाकर अल्लिवार, विरुटकर, मिनाक्षी बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी किरन अंदनकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: To solve the problem of Gramsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.