मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:02 PM2019-02-08T22:02:14+5:302019-02-08T22:02:30+5:30

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर शाखेने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना सादर केले. यावेळी ना. बडोले यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Solve the problems of backward class employees | मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवा

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देकास्ट्राईब कर्मचारी महासंघ : बडोले यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर शाखेने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना सादर केले. यावेळी ना. बडोले यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यतील मागासवर्गीय कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यात याव्या, महासंघाच्या कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात किंवा जिल्हा परिषद परिसरात एक खोली उपलब्ध करून द्यावी, जि. प. चंद्रपूर येथे अद्यावत मागासवर्गीय कक्षाची स्थापना करावी, विविध विभागातील बिंदूनामावली अद्यावत करून पदोन्नतीची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढावी, जिल्ह्यात अंतर्गत बदलीत पती-पत्नी एकत्रिकरणात झालेला अन्याय दूर करावा, विद्यार्थ्यांना मिळणारी विविध शिष्यवृत्ती सहज सुलभरितीने विद्यार्थ्यांना मिळेल असा प्रयत्न शासनस्तरावरून करावा, शासकीय माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक वर्ग २ ची पदे तातडीने पदोन्नतीव्दारे भरावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन ना.बडोले यांनी यावेळी दिले.
चंद्रपूर भेटीवर असताना शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष मोरेश्वर बारसागडे यांच्यासह वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक राऊत, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढोके, कालिदास वाळके, इंजि. राजकन्या ताकसांडे, अजित साव, देवानंद उराडे, मारोती जुमडे, कैलास कांबळे व प्रमोद गेडाम उपस्थित होते.

Web Title: Solve the problems of backward class employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.