कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:29+5:302020-12-24T04:26:29+5:30
समस्या सोडवा राजुरा : तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अल्प पावसामुळे पिके वाया गेली. शिवाय, ...
समस्या सोडवा
राजुरा : तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अल्प पावसामुळे पिके वाया गेली. शिवाय, बोंड अळीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण केले. मात्र, शेतकºयांना अद्याप भरपाई दिली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. काही शेतकºयांच्या कापसाचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना मदत करण्याची मागणी होत आहे.
पेल्लोरा येथे रस्ता तयार करण्याची मागणी
राजुरा : निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्याप रस्त्यांनी जोडली नाहीत. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. निर्ली येथील विद्यार्थ्यांना झाडे-झुडूपांमधून वाट काढत पेल्लोरा येथील शाळा-महाविद्यालयात जावे लागते. निर्ली व पेल्लोरा येथील शेतकºयांना शेताकडे जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जोडला आहे. पण, पावसाळ्यात प्रचंड त्रास होतो.
शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. परंतु, यंदा कमी पाऊस पडल्याने पिके वाया गेली. शेतकºयांना लागवडीचाही खर्च मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत. त्यामुळे दुग्ध व शेतीपूरक अन्य योजना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे
बँकेसाठी नवी इमारती उभारण्याची मागणी
चंद्रपूर : दुर्गापूर येथील अलाहाबाद बँकेत दरवर्षी खातेदारकांची संख्या वाढतच आहे. मात्र, जुन्या इमारतीतील अपुºया व कोंदट जागेमुळे खातेदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बदलत्या गरजा लक्षात घेवून बँक व्यवस्थापनाने इतरत्र प्रशस्त जागेत हलवावे अथवा नव्या इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा.