शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:57 PM2018-11-06T22:57:55+5:302018-11-06T22:58:11+5:30
मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलन, धरणे, निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इंग्रजी शाळेतील शिक्षकांमध्ये संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलन, धरणे, निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इंग्रजी शाळेतील शिक्षकांमध्ये संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.
राज्यातील हजारो शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने शाळेतील बोर्डाचा निकाल दरवर्षी उत्तम लागत आहे. विनाअनुदानीत असलेल्या शाळा महाराष्टÑ राज्य शालेय शिक्षणाच्या माध्यमातून चालत असून या कर्मचाऱ्यांना खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियम १९७७ व १९८१ लागू आहे. या माध्यमातून त्यांना शासन निर्णयानुसार सन २००६ पासून सहावे वेतन आयोगानुसार वेतन देणे बंधनकारक आहे. परंतु, राज्यातील एकाही शाळेत नियमानुसार वेतन दिल्या जात नाही, त्याचबरोबर अनेक शाळेत दरवर्षी होत असलेली वेतनवाढ ही वर्षानुवर्षे देण्यात येत नाही. यासोबतच अनेक शाळेत नियुक्तीपत्र, वैद्यकीय रजा, महिलांना वेतनासह प्रसूती रजा व इतर सुविधा दिल्या जात नाही. याबाबत आवाज उठविल्यास शिक्षकांना नोकरीवरुन कमी करण्याचा धमकी देण्यात येते. शुल्लक कारणावरुन वेळोवेळी वेतन कपात करण्यात येते, अशा अनेक समस्यांना शिक्षकांना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी शिक्षकवर्गांकडून होत आहे