पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:48+5:302021-06-01T04:21:48+5:30

बामणीवासीयांचे ग्रामपंचायतकडे साकडे बल्लारपूर : पावसाळ्यात दरवर्षी घरात पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी बामणी येथील वॉर्ड क्रमांक ...

Solve the water problem before the rains | पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडवा

पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडवा

Next

बामणीवासीयांचे ग्रामपंचायतकडे साकडे

बल्लारपूर : पावसाळ्यात दरवर्षी घरात पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी बामणी येथील वॉर्ड क्रमांक २ मधील शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोरीमुळे दोन वर्षांपासून पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे.

दरवर्षी पावसाळा आला की, पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरते व कॉलनीतील लोकांचे अतोनात नुकसान होते. वसाहतीतील शिक्षक केशकर यांनी सांगितले की, तीन वर्षांआधी महामार्गावर बनविलेल्या नालीमुळे ही समस्या निर्माण झाली. नाली उंचावर असल्यामुळे वसाहतीचे पाणी त्या नालीत जात नाही व जमा होऊन राहते व रहिवाश्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यंदा तरी हा प्रश्न कायमचा सुटावा, अशी कॉलनीतील लोकांची भावना आहे. ग्रामपंचायतने यासंदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही निरीक्षण केले आहे; परंतु ही समस्या पावसाळ्याआधी सोडवावी, अशी ग्रामपंचायतची बांधकाम विभागाकडे विनंती आहे.

Web Title: Solve the water problem before the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.