‘चांदा सिटी हेल्पलाईन ॲप’ मधून १७७७ तक्रारींचा निपटारा

By राजेश मडावी | Published: June 7, 2023 05:50 PM2023-06-07T17:50:29+5:302023-06-07T17:52:41+5:30

मनपाचा दावा : ॲपवर नागरिकांच्या १९४९ तक्रारी प्राप्त

solved 1777 complaints through 'Chanda City Helpline App', chandrapur municipal corporation claims | ‘चांदा सिटी हेल्पलाईन ॲप’ मधून १७७७ तक्रारींचा निपटारा

‘चांदा सिटी हेल्पलाईन ॲप’ मधून १७७७ तक्रारींचा निपटारा

googlenewsNext

चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे सुरु केलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपवर आतापर्यंत १९४९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १७७७ तक्रारींचा निपटारा झाला, असा दावा मनपाने केला आहे.

चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून मनपाच्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारी पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनास प्राप्त व्हायच्या. आयुक्तांच्या संकल्पनेतुन मनपाच्या स्थापना दिवशी चांदा सिटी हेल्पलाईन ॲपची सुरवात झाली.

या ॲपवर स्वच्छता, समाज कल्याण, दिव्यांग, महिला व बालकल्याण, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, एनयुएलएम, वीज व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग,मोकाट जनावरे, बांधकाम, नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरिकांना तक्रार करता येते. तक्रार प्राप्त होताच ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुखांची आहे, अशी माहिती मनपाने दिली.

नागरिकांनो, अशी करा तक्रार

इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करा. किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत परिसर, विभाग, तक्रार पाठविणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावी. गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन मनपाने केले.

Web Title: solved 1777 complaints through 'Chanda City Helpline App', chandrapur municipal corporation claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.