घरकूल यादीचा घोळ निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:22+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली.

Solved the problem of List of homes | घरकूल यादीचा घोळ निकाली

घरकूल यादीचा घोळ निकाली

googlenewsNext
ठळक मुद्दे२३२ लाभार्थ्यांना दिलासा : लाभार्थ्यांची नावे मूळ गावात समाविष्ट

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : ऑगष्ट २०१६ रोजी घरकूल यादीमध्ये प्रशासकीय पातळीवर झालेली घोडचूक अखेर दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे तालुक्याच्या १२ गावांतील २३२ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी ‘लोकमत’ ने हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली. मंजुरीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आली. मात्र यादी बनविताना प्रशासनाने काळजी न घेतली नाही. त्यामुळे १२ गावातील २३२ लाभार्थ्यांना ही चुक भोवली. यादी दुरूस्त करण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू होती. अखेर ‘लोकमत’ च्या पाठपुराव्यामुळे गुरूवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ गावांपैकी १९ गावातील हा प्रश्न निकाली निघाला होता. येत्या चार पाच दिवसात सर्वच गावांची समस्या दूर होणार आहे.

प्रशासन झाले जागे
प्रशासनाकडून घरकूल यादीत घोळ निर्माण केल्याने पात्र नागरिकांवर अन्याय झाला होता. लोकमतने सुरूवातीपासून हा प्रश्न लावून धरल्याने प्रशासन जागे झाले. त्यामुळे चुकी दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पात्र कुटुंब घरकूलपासून वंचित
शंकरपूर : खैरी येथील संजय शंकर नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल योजनेच्या शासनाच्या प्रपत्र ब मध्ये आहे. परंतु पंचायत समितीच्या चुकीने घरकूलपासून वंचित राहावे लागत आहे. संजय नांदेकर हे अनेक वर्षांपासून घरकूलसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत सन २०१६ च्या पात्र यादीत आले होते. मात्र, घरकूलचा लाभ मिळाला नाही. सदर व्यक्तीचे नाव चुकीने वगळण्यात आले. नाव यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुशील गंत्रटवार यांनी दिली.

लाभार्थ्यांची नावे मूळ गावांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी संंबंधित गावाच्या ग्रामसभेचा ठराव मागण्यात आला होता. राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सहकार्याने आतापर्यंत १९ गावांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तीन-चार दिवसात उर्वरित गावांचाही प्रश्न लवकरच सुटणार आहे.
- प्रणव बक्षी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जि. ग्रा.वि.यंत्रणा चंद्रपूर
पात्र कुटुंबांवर अन्याय होऊ नये, यासाठी 'लोकमत' ने हा प्रश्न सातत्याने उचलून धरला. जि. प. मध्ये मी यावर चर्चा घडवून आणली. ही समस्या आता दूर होणार असल्याने याचा आनंद आहे.
- संजय गजपुरे, जि.प.सदस्य पारडी-मिंडाळा.

Web Title: Solved the problem of List of homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.