मुलानेच केली विळ्याने भोकसून पित्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:26+5:302021-01-04T04:24:26+5:30

कोरपना : तालुक्यातील कोराडी गावातील शिवारात विळ्याने भोसकून मुलाकडून पित्याची हत्या करण्यात आल्याचे शनिवारी पोलीस तपासात निष्पन्न झाले. ...

The son himself killed his father by stabbing him | मुलानेच केली विळ्याने भोकसून पित्याची हत्या

मुलानेच केली विळ्याने भोकसून पित्याची हत्या

Next

कोरपना : तालुक्यातील कोराडी गावातील शिवारात विळ्याने भोसकून मुलाकडून पित्याची हत्या करण्यात आल्याचे शनिवारी पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुलाकडूनच जन्मदात्याची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.

शंकर रामकिसन फोपरे (वय ४४) रा. नांदगाव (सूर्या.) असे मृत वडिलांचे नाव असून शेतात काम करताना त्यांच्यावर पोटच्या मुलानेच विळ्याने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल शंकर फोपरे (२०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृत शंकर रामकिसन फोपरे यांच्यासह तीन भावांचे एकमेकांना लागून शेत आहे. मृत शंकर यांचा मुलगा व पत्नी त्याच शेतात काम करीत होते. हत्येपूर्वी तिघांनीही सोबत जेवण घेतले. आई कामासाठी गेली असताना मुलगा राहुल व मृत शंकर यांच्यात बाचाबाची झाली. मुलाची वागणूक बरोबर नसल्यामुळे वडिलांना पटत नव्हते. त्यामुळे वडिलांनी त्याला चांगले राहण्याबाबत वारंवार समजावले. मात्र आरोपी राहुल वडिलांचे कधीच ऐकत नव्हता. शेतातसुद्धा त्याच विषयावर चर्चा झाली असताना आरोपी राहुलला सहन न झाल्याने शेतात कामासाठी वापरण्यात येणाऱ्या विळ्याने भोसकून वडिलांची हत्या केली. एकाच शेतात काम करत असतानासुद्धा घटनेची पुसटशी कल्पनाही पत्नीला मुलाने लागू दिली नाही.

पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार गोपाल भारती यांनी घटनास्थळ गाठून हत्येची सखोल तपासणी केली आणि अवघ्या दोन तासात आरोपीचा छडा लावला. आरोपीवर भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: The son himself killed his father by stabbing him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.