दारूबंदी उठताच चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:33+5:302021-08-15T04:28:33+5:30
कोरपना : जिल्ह्यात दारूबंदी असताना चोरीच्या घटना अत्यल्प होत्या. मात्र एक महिन्यापूर्वी दारूबंदी उठताच चोरटे सक्रिय झाले असून चोऱ्यांच्या ...
कोरपना : जिल्ह्यात दारूबंदी असताना चोरीच्या घटना अत्यल्प होत्या. मात्र एक महिन्यापूर्वी दारूबंदी उठताच चोरटे सक्रिय झाले असून चोऱ्यांच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
रोज वेगवेगळ्या शेतातील मोटारपंप, विजेचे तार, कारंजे, पाणी देण्याचे पाईप, शेती उपयोगी उपकरणे व इतर किरकोळ साहित्य चोरी करून भंगारमध्ये विकल्या जात आहे. याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना रोज शेतामध्ये किरकोळ चोऱ्या होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
बॉक्स
भंगार व्यावसायिकांना सुगीचे दिवस
दारूबंदीच्या काळात चोरटे अवैध दारू विक्रीच्या कामात सक्रिय होते. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे भंगार व्यावसायिकांना चोरीचे साहित्य त्यावेळी मिळत नव्हते. मात्र आता दारूबंदी उठल्याने चोरटे चोऱ्या करण्यात सक्रिय झाले असून भंगार व्यावसायिकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहे.
कोट
माझ्या शेतात १३ ऑगस्टच्या रात्री तिसरी चोरी झाली. काही दिवसांपूर्वी चोरी झाल्यानंतर मी नांदा फाटा पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसून उलट रात्री शेतात झोपण्याचे सल्ला दिला. त्यामुळे आम्ही कसे जगायचे हा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही सर्व शेतकरी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार.
- गजानन पावडे, शेतकरी