जिल्हा अनलॉक होताच व्यावसायिकांचे मास्क निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:02+5:302021-06-09T04:36:02+5:30
प्रशासनाने दिलेले सर्व नियम धाब्यावर भद्रावती : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता येताच चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा शिथिलता देण्यात ...
प्रशासनाने दिलेले सर्व नियम धाब्यावर
भद्रावती : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता येताच चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा शिथिलता देण्यात आली. या शिथिलतेमुळे भद्रावती शहरातील प्रतिष्ठानामधील मालक व नोकर वर्गांचे तोंडावरील मास्क निघाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यामुळे पुन्हा कोरोना संसर्गाची शक्यता आहे.
शहरात अनलॉकच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना आपली प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी मिळाली. मात्र, प्रशासनाने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यात नियमित मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना-दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता प्रवेश करताना त्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक केले आहे. अनलॉकच्या पहिल्या दिवशी काही पेट्रोल पंपांवर, सब्जी मंडी फळविक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. सुरक्षित अंतराचा अभाव होता तर काही प्रतिष्ठानांमध्ये सॅनिटायझर किंवा इतर हात धुण्याचे साबण नसल्याचे बघावयास मिळाले. शासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या असल्या तरी व्यापाऱ्यांकडून या नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या संसर्गामुळे कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना लाटेला रोखण्यासाठी नगर परिषद आरोग्य विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
===Photopath===
070621\img_20210607_113910.jpg
===Caption===
जिल्हा अनलॉक होताच व्यावसायिकांचे मास्क निघाले.