‘त्या’ वाघिणीचा लवकरच बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:51 PM2018-03-18T22:51:11+5:302018-03-18T22:51:11+5:30
वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे.
आॅनलाईन लोकमत
तळोधी/गिरगाव : वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे. दरम्यान, रविवारी गिरगाव येथील ग्रामस्थानी भ्रमनध्वनीवरून राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. त्यानंतर वाघिणीचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसे आदेश वनविभागालाही दिले.
गेल्या १०-११ दिवसांपासून वाघीण व तीन बछडे गिरगाव परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या दहा दिवसात वाघिणीने तीन शेतकºयांवर हल्ले केले. तसेच एक गोºहा व एक गाय मारली. त्यामुळे सध्या परिसरात वाघिणीची मोठी दहशत माजली आहे. सध्या शेतात जाणे शेतकºयांना कठीण झाले आहे. वाघिणीचे व तिच्या बछड्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले असून शेतावर जाणे अनेकांनी बंद केले आहे.
वाघिणीला बेशुद्ध करुन तिला दुसºया ठिकाणी नेण्यासंदर्भात येथील वनाधिकाºयांनी वरिष्ठांना परवानगी मागितली आहे. एनटीपीसीकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार रविवारी गिरगाव येथे जि.प. सदस्य तथा सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्य संजय गजपुरे, स्विय सहाय्यक सुहास अलमस्त यांनी गावकºयांसोबत एक बैठक घेतली. गिरगाव येथील सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच शरद सोनवाने, विनोद बोरकर, जि.प. सदस्य नैना गेडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के, राधेशाम जयस्वाल, गीता बोरकर, रमेश बोरकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत गावकºयांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर यावर काय उपाययोजना करता येईल, मासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी वाघिणीचा लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी गावकºयांना दिले. वनविभागाला या संदर्भात सूचनाही दिल्या.