शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:20 PM2018-02-22T23:20:49+5:302018-02-22T23:21:39+5:30

शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल ! असे आवाहन करत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी वनौषधीचे पीक घेताना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले.

Sow the same in the field, which will go into the stomach! | शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल !

शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल !

Next
ठळक मुद्देबाबा रामदेव : जिल्हास्तरीय कृषी मेळाव्याला शेकडो शेतकºयांची उपस्थिती

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल ! असे आवाहन करत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी वनौषधीचे पीक घेताना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले. जिल्हा परिषदेमार्फत गुरूवारी वरोरा येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, नगराध्यक्ष एहतेशाम अली, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, माजी मंत्री संजय देवतळे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, सभापती ब्रिजभुषण पाझारे, सभापती गोदावरी केंद्रे, राहुल सराफ, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवी डॉ. विकास आमटे यांनी रामदेव बाबा यांचा आम्ही समानधर्मी या शब्दात सन्मान केला. रामदेव बाबानी आनंदवनला भेट देवून तेथील दिव्यांगाची आस्थेने विचारपूस केली. मेळाव्यात महात्मा ज्योतीबा फुले यांचे शेतकºयांचे आसूड व संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगिता या पुस्तकांची भेट बाबा रामदेव यांना सत्कारात देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांना नांगराची लाकडी प्रतिकृती भेट दिली.
कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार व प्रशांत कऱ्हाडे यांनी केले. या मेळाव्यात शेतीविषयक विविध स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवदास, कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अ. ना. हसनाबादे, प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sow the same in the field, which will go into the stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.