१२७० हेक्टरवर होणार सोयाबिनचे ग्राम बिजोत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:17 PM2018-06-11T23:17:01+5:302018-06-11T23:17:14+5:30
मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासणार नाही.
केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एमएमएईटी) तसेच बियाणे, लागवड साहित्य उपअभियानांअतर्गत (एसएमएसपी) ग्राम बिजोत्पादन करण्याची मोहीम जिल्ह्यात मागील वर्षी राबविण्यात आली होती. परंतु, लागवडीचे उद्दिष्ट कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळावे, यासाठी खासगी कंपन्यांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. सर्वच तालुकयात अभियानाची सुरुवात झाली होती. मागील वर्षी राज्यातील २२ जिल्ह्यामध्ये दोन लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावर ग्राम बिजोत्पादन झाले. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट कमी मिळाल्याने अनेक शेतकरी सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे ग्राम बिजोत्पादन मोहिमेअंतर्ग उत्तम दर्जाचे बियाणे मिळणे कठीण झाले होते. दरम्यान कृषी विभागाने मोहिमेची व्याप्ती वाढवून यंदाच्या खरीप हंगामात १२७० हेक्टर क्षेत्रावर वाढविण्याचा निर्णय घेतला. संबंधित अधिकारी व महाबीजचे पथक योजनेची माहिती शेतकºयांना देण्याचे नियोजन केले. काही तालुक्यांतील शेतीच्या बांधावर जावून योजनेत सहभागी होण्याचे सांगितले जात आहे. शेतकºयांचा मोहिमेत सहभाग वाढला तर सोयाबिनचे दर्जेदार बियाणे विकत घेण्यासाठी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. दरम्यान जिल्ह्यात मृगाचा पाऊस बरसला. शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करीत आहेत. बियाणे व खताची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून येते. ग्राम बिजोत्पादन मोहिमेत प्रती हेक्टर १७०० रुपये अनुदान मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
महाबीज देणार बियाणे, प्रशिक्षण
ग्राम बिजोत्पादन मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून सोयाबिन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्रामध्ये बियाण्यांची लागवड करता करता येईल. यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेवून मोहिमेत सहभागी होता येईल. बियाण्यांची लागवड केल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले असता महाबीजच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.
बोगस बियाण्यांना प्रतिबंध
योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १७०० रुपये अनुदान देण्यात येईल. सोयाबिन बियाणे पुढील हंगामात वापरण्यासाठी ग्राम बिजोत्पादन या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये. शिवाय खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारू नये याकरिता मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशिल आहेत.