सोयाबीन पीक पडतेय पिवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काही भागातील सोयाबीन पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वर्गात चिंतेचे वातावरण आहे. हा पिकांवरील रोग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही भागातील सोयाबीन पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वर्गात चिंतेचे वातावरण आहे. हा पिकांवरील रोग नसून, सुरुवातीला या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असताना काही भागात अतिपाऊस पडून पाणी शेतात साचल्याने पीके पिवळे पडत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहेत. शेतकऱ्यांनी साचलेले पाणी चराद्वारे बाहेर काढावे तसेच रुंद सरी, वरंभा (बीबीएफ) पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी शेतात साचत असलेले पाणी बाहेर काढावे. यामुळे पिकाचे संरक्षण होईल, शिवाय पिकाची चांगली वाढही होईल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. ज्या शेतकºयांनी अद्याप सोयाबीनची पेरणी केली नाही. त्या शेतकºयांनी रुंद सरी वरंभा (बीबीएफ) पद्धीने पेरणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.