सोयाबीनच्या पानांचे झाले जाळ्यांमध्ये रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:04+5:302021-08-23T04:30:04+5:30

सचिन सरपटवार फोटो भद्रावती : तालुक्यातील खुटाळा, वाघेडा, सागरा गावातील सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्या व ...

The soybean leaves turned into nets | सोयाबीनच्या पानांचे झाले जाळ्यांमध्ये रूपांतर

सोयाबीनच्या पानांचे झाले जाळ्यांमध्ये रूपांतर

Next

सचिन सरपटवार

फोटो

भद्रावती : तालुक्यातील खुटाळा, वाघेडा, सागरा गावातील सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्या व उंट अळ्यांचे आक्रमण झाले असून सोयाबीनच्या पानांचे रूपांतर जाळ्यांमध्ये झाले आहे.

काळ्या व हिरव्या अळ्या प्रामुख्याने दिसून येत आहेत. झाडांची पाने अळ्या फस्त करीत असून शेंगा खात आहेत. त्याची टरफले खाली पडलेली आहेत. यामुळे सोयाबीन पिकावर याही वर्षी नांगर फिरवावे लागते की काय, अशी भीती निर्माण झाल्याचे सागरा साजा येथे शेत असलेले रत्नदीप कुठे या शेतकऱ्याने व्यक्त केली.

रत्नदीप कुठे यांनी साजरा साजा येथे नऊ एकरमध्ये सोयाबीन लावले आहे. आज सोयाबीनची झाडे कंबरेपर्यंत आली. परंतु झाडांवर मोठ्या प्रमाणात तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्या व उंट अळ्यांचे साम्राज्य आहे. पानाच्या फक्त शिरा दिसत आहे. शेंगा खाल्ल्या असून टरफल खाली पडलेली आहेत. आतापर्यंत तीन फवारण्या झाल्या. जवळपास ७० ते ८० हजारांचा खर्च झाला. पीक हातात येणार नसल्याने सोयाबीन पिकावर पुन्हा नांगर फिरवण्याची भीती रत्नदीप कुठे यांनी व्यक्त केली. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली.

यासोबतच खुटाळा येथील भालचंद्र बोथले, वाघेडा येथील पुरुषोत्तम झाडे तसेच वाघेडा येथील डॉक्टर आनंद दातारकर यांच्या शेतातही अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

220821\img-20210822-wa0112.jpg

अळ्यांमुळे सोयाबीनच्या पानांचे जाळ्यात रूपांतर झाले

Web Title: The soybean leaves turned into nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.