सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:28 AM2018-11-19T00:28:34+5:302018-11-19T00:29:01+5:30
नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला होता. कापूस उत्पादक शेतकºयांनी गतवर्षाचा अंदाज घेऊन सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत बियाण्याच्ांी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस आला. त्यामुळे सोयाबीन पीक समाधानकारकरीत्या उगविले होते. मात्र, सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या स्थित असताना पावसाने दगा दिला. याचा जोरदार फटका जिल्ह्यातील पिकांना बसला आहे. राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिनची मळणी केली. यामध्ये एकरी उत्पन्नात मोठी घट आली. शासनाने सोयाबिनला हमीभाव दिल्याने शेतकरी आशावादी झाला होता. व्यापाऱ्यांच्या दारात न जाता आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हमी भावाने सोयाबिन विकण्याचे स्वप्न पाहत होते. पण यंदाच्या अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतीसाठी कर्ज घेतले होते. उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
मागील तीन वर्षांपासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकºयांचे अर्थकारण बिघडले. खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने रब्बी व खरिप हंगामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी पुढे येत आहेत. काळानुसार शेती करतो म्हटले तर निसर्ग साथ देत नाही. भरघोस उत्पन्न मिळाल्यास सुलतानी संकट उभे राहते. हा प्रकार यंदाही शेतकºयांबाबत घडत आहे.