भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

By admin | Published: October 25, 2014 10:37 PM2014-10-25T22:37:01+5:302014-10-25T22:37:01+5:30

सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या

Soybean production crisis due to falling prices | भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

Next

लखमापूर : सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली. यातच दरवर्षी दिवाळी सणाआधी कापूस व सोयाबिन पिकाने घर भरुन दिसायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांची घरे रिकामी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही सिंचनाखालील जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन निघाले आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमालिची घसरली आहे. बाजारात संध्या कापसाला ३७०० रुपये तर सोयाबिनला २२०० ते २८०० रुपये भाव आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात मालाची विक्री करावी लागत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाने तर कधी पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात ओलिताची सुविधा असणारे शेतकरी पाणीपुरवठा करीत आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. दरवर्षी शेतीपयोगी खताच्या बियाण्यांच्या आणि किटकनाशकाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजारांपर्यंत जात आहे. शेतात काम करणाऱ्या गडीमाणसाचे वार्षिक संकट ७० ते ८० हजार तर कुठे एक लाखापर्यंत आहे. मजुरांच्या मजुरीतही कमालीची वाढ झाली आहे. या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ ठप्प आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन केव्हा येणार असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये आळवला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन हंगामाची सुरुवात केली. दुबार -तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. आता पीक घरात नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील पावसाची पातळी कमी होत असल्याने ओलीत करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याअभावी झाडांना फळधारणा अत्यल्प दिसत आहे. याचा परिणाम निश्चितच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात काही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यात कोरपना तालुक्यातील कापूस खरेदी डबघाईला आली आहे. त्यामुळे यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापसाची खरेदी विक्री करावी लागणार आहे. उत्पादन कमी असल्याने वाहन खर्च करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरणार असल्याचे दिसते. दिवाळी अंधारात जात असतानाच शेतकऱ्यांचे दिवाळेही निघण्याची वेळ आली आहे. शासन शेतकऱ्यांसाठी योजनांचा काय पाऊस पाडते हे येणारा काळच ठरवेल. (वार्ताहर)

Web Title: Soybean production crisis due to falling prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.