कोरपना तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढला, कपाशीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST2021-07-24T04:17:54+5:302021-07-24T04:17:54+5:30
जून महिन्यातच बऱ्यापैकी पाऊस पडल्याने, तालुक्यात ३८ हजार ६४५ हेक्टरवर मूग, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस पेरणी करण्यात आली आहे. ...

कोरपना तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढला, कपाशीत घट
जून महिन्यातच बऱ्यापैकी पाऊस पडल्याने, तालुक्यात ३८ हजार ६४५ हेक्टरवर मूग, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस पेरणी करण्यात आली आहे. काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने, शेतकऱ्यांनी बँक, खासगी सावकाराकडून कर्ज काढून यंदाचा हंगाम केला आहे.
यंदाचे तालुक्यात पीकनिहाय क्षेत्र
तूर ३०७४.२३ हेक्टर, सोयाबीन मागील वर्षी ६,८०४ हेक्टर, तर यंदा ८,४७१ हेक्टरवर पेरणी झाली. कापूस मागील वर्षी २९ हजार १९५ हेक्टर तर यंदा २७ हजार ५१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. यात ज्वारी, मूग, उडीद व काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी तालुक्यात ११००-१२०० मिमी पावसाची नोंद होत असते. यंदा जून-जुलै महिन्यात १३ जुलैअखेर पंचवीस दिवसांत ४९७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पाऊस पिकांना पोषक असाच पडत आहे.
सोयाबीनचे बियाणे घरचे वापरावे
सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे. यामुळे बियाण्यांचा होणारा खर्च वाचतो. उगवण क्षमता चांगली असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होत नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरल्यास अधिक सोईचे होईल. सोयाबीनवर भुंग्याचा प्रादुर्भाव होतो व कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेळीच कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात.
- रवींद्र डमाळे, तालुका कृषी अधिकारी, कोरपना.