परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान
By admin | Published: October 17, 2016 12:43 AM2016-10-17T00:43:12+5:302016-10-17T00:43:12+5:30
मागील वर्षी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीच्या सोयाबीनचा वापर केला होता.
शेतकऱ्यांंची दिवाळी अंधारात : ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी
वरोरा : मागील वर्षी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीच्या सोयाबीनचा वापर केला होता. या वाणाला प्रति हेक्टर आठ ते दहा क्विंटलचे उत्पादन मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षीही याच वाणाचा वापर केला. मात्र अतिवृष्टी झाल्याने एका कंपनीचे सोयाबीन पूर्णत: खराब झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी न करताच जनावरांना चारण्याकरिता मोकळे करून दिले. तर काही शेतकऱ्यांनी सोयाविन कापण्याच्या मानसिकतेतच नसल्याची दिसून येत आहे .
सोयाबिन दिवाळीपूर्वी निघणारे मुख्य पीक असून दिवाळीची खरेदी सोयाबिनच्या विक्रीवर अवलंबून असते. तर मजुरांचे देणेघेणेही याच कालावधीत करायचे असते पण या वर्षी शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबिनचे उत्पादन झाले नाही. परिणामी दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. शासनाने क्षतिग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षर्णे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांचा मोबदला दिवाळीपूर्वी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जयंत टेमुर्डे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुका अध्यक्ष बंडू खारकर नगरसेवक, प्रदीप बुरान, नगरसेवक शांताराम लोहकरे, शहर अध्यक्ष राजू वरघने, उत्तम इंगोले, ग्रा. प. डोंगरगाव (रेल्वे) चे सरपंच राकेश काळे. जितेंद्र आसेकर ,विजय गौरकार, कार्तिक कामतवार, राहुल नगराळे, अमित फुलझेले, विशाल पारखी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सोयाबिन जाळून केला निषेध
निवेदन दिल्यानंतर सत्ताधारी पक्षावर रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा कार्यकर्त्यांनी सोयाबिन जाळून शासनाचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजप सरकारविरुद्ध नारेबाजी करण्यात आली.
(शहर प्रतिनिधी)